Ladki Bahin Yojana राज्यातील महिलांच्या सर्वांगीण विकासासाठी सरकार विविध योजना राबवत आहे. याच पार्श्वभूमीवर, राज्य सरकारने “लाडकी बहीण योजना” ही महत्त्वाची योजना सुरू केली आहे. लाडकी बहीण योजनेचा डिसेंबर महिन्याचा हप्ता कधी? याबाबत महिलांमध्ये मोठी उत्सुकता आहे. नोव्हेंबरपर्यंतच्या हफ्त्यांची रक्कम बऱ्याच महिलांना मिळाली असली तरी, डिसेंबरचा हप्ता कधी येईल याची वाट पाहत होत्या. याबाबत आता नवीन अपडेट समोर आली आहे. या लेखात आपण या अपडेटबद्दल सविस्तर माहिती जाणून घेऊया.
या योजनेचे मुख्य उद्दिष्ट्य म्हणजे राज्यातील गरजू महिलांना आर्थिक मदत करून त्यांचे सक्षमीकरण करणे. पात्र महिलांना दरमहा 1500 रुपये दिले जातात. या योजनेच्या सुरुवातीपासून आतापर्यंत पाच हप्ते महिलांना मिळाले असून, त्यांच्या बँक खात्यात एकूण 7500 रुपये जमा झाले आहेत. या योजनेमुळे महिलांना स्वतःचे आणि आपल्या कुटुंबाचे उत्पन्न वाढवण्यास मदत होईल.
लाडक्या बहिणींसाठी मुख्यमंत्री शिंदे यांची मोठी घोषणा
महायुती सरकारने त्यांच्या जाहीरनाम्यात महिलांसाठी विशेष आश्वासन दिले होते, त्यानुसार सध्या सुरू असलेल्या लाडकी बहीण योजनेच्या मासिक रकमेतील वाढ करण्यात येणार आहे. सध्याची मासिक रक्कम 1500 रुपये आहे, परंतु नवीन सरकार स्थापन झाल्यानंतर ती वाढवून 2100 रुपये केली जाईल. राज्यातील महिलांना आर्थिक साहाय्य देण्यासाठी हा निर्णय घेण्यात येणार असून, नागपूर येथे होणाऱ्या हिवाळी अधिवेशनात याबाबत अधिकृत घोषणा केली जाण्याची शक्यता आहे. मुख्यमंत्री शिंदे यांनी दिलेल्या वचनानुसार, महिलांसाठी हा मोठा बदल घडवून आणला जाईल.
लाडकी बहीण योजना ही राज्यातील लाखो महिलांसाठी आर्थिक आधार ठरली आहे. या योजनेअंतर्गत 21 ते 65 वयोगटातील महिलांना दरमहा दीड हजार रुपये दिले जात आहेत. मात्र, महायुतीने निवडणुकीत दिलेल्या आश्वासनानुसार, आता या रकमेत वाढ होऊन महिलांना 2100 रुपये मिळण्याची शक्यता आहे. सर्व पात्र महिलांना आता सहाव्या हप्त्याची प्रतीक्षा आहे. ही वाढीव रक्कम नक्कीच महिलांच्या उत्साहात भर टाकेल आणि त्यांच्या आर्थिक स्थितीत सुधारणा करण्यास मदत करेल.
रक्कम वाढवून टप्प्याटप्प्याने ₹3,000 रुपये करण्याचा सरकारचा विचार आहे
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ही महिला सक्षमीकरणाच्या दिशेने उचललेले एक महत्त्वपूर्ण पाऊल आहे. राज्य सरकारने या योजनेला कायमस्वरूपी ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. आर्थिक वर्षात या योजनेस 35 हजार कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यापूर्वी स्पष्ट केले होते की, राज्याची आर्थिक स्थिती मजबूत झाल्यावर या योजनेअंतर्गत देण्यात येणारी दरमहा 1500 रुपयांची रक्कम वाढवून टप्प्याटप्प्याने तीन हजार रुपये करण्याचा त्यांचा विचार आहे. या घोषणेमुळे राज्यभरातील लाखो महिलांमध्ये उत्साह निर्माण झाला आहे.
लाडकी बहीण योजनेबाबत 10 प्रमुख मुद्दे
1) योजनेचे उद्दिष्ट: राज्यातील गरजू महिलांना आर्थिक मदत करून त्यांचे सक्षमीकरण करणे.
2) मासिक रक्कम: पात्र महिलांना दरमहा 1500 रुपये.
3) हप्ते: आतापर्यंत पाच हप्ते महिलांना मिळाले आहेत.
4) रक्कम वाढ: महायुती सरकारने रक्कम वाढवून 2100 रुपये करण्याचे आश्वासन दिले आहे.
5) घोषणा: नागपूर येथे होणाऱ्या हिवाळी अधिवेशनात याबाबत अधिकृत घोषणा होण्याची शक्यता आहे.
6) वय: 21 ते 65 वयोगटात महिला पात्र.
7) आर्थिक तरतूद: या योजनेसाठी 35 हजार कोटी रुपये तरतूद करण्यात आली आहे.
8) कायमस्वरूपी योजना: ही योजना कायमस्वरूपी आहे.
9) रक्कम वाढ: भविष्यात रक्कम वाढवून 3000 रुपये करण्याचा विचार आहे.
10) महिला सक्षमीकरण: ही योजना महिला सक्षमीकरणाच्या दिशेने एक महत्त्वपूर्ण पाऊल आहे.
लाडकी बहीण योजनेचा लाभ घेण्यासाठी कोणत्या महिला पात्र आहेत?
महाराष्ट्रात राहणाऱ्या सर्व महिलांसाठी राज्य सरकारने लाडकी बहीण योजना सुरू केली आहे. काही विशिष्ट निकष पूर्ण करणे आवश्यक आहे. “लाडकी बहीण योजना” ही सर्वसाधारण महिलांसाठी आहे ही योजना विवाहित, विधवा, घटस्फोटित, परित्यक्त्या किंवा निराधार असलेल्या महिलांसाठी आहे. या योजनेचा लाभ घेण्यासाठी तुमचे वय कमीत कमी 21 वर्षे आणि जास्तीत जास्त 60 वर्षे असणे आवश्यक आहे. याशिवाय, तुम्हाला या योजनेचा लाभ घेण्यासाठी तुमचे स्वतःचे बँक खाते असणे आवश्यक आहे. सर्वात महत्त्वाच तुमच्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न 2.50 लाख रुपयांपेक्षा जास्त नसावे. जर तुम्ही वरील सर्व निकष पूर्ण करता, तर तुम्ही लाडकी बहीण योजनेचा लाभ घेण्यासाठी पात्र आहात.
लाडकी बहीण योजनेचा लाभ घेण्यासाठी तुम्हाला काही आवश्यक कागदपत्रे जमा करावी लागतील. यामध्ये तुमचे आधार कार्ड, महाराष्ट्र राज्य सरकारकडून दिलेले रहिवाशी प्रमाणपत्र किंवा जन्म दाखला, तुमच्या कुटुंबाचे उत्पन्न दाखवणारे प्रमाणपत्र, तुमच्या बँक खात्याची पासबुकची पहिली पानची छायाप्रत, तुमचा पासपोर्ट आकाराचा फोटो, तुमची शिधा पत्रिका (रेशन कार्ड) आणि योजनेच्या सर्व अटी शर्ती मान्य करण्याबाबतचे एक हमीपत्र यांचा समावेश आहे. या सर्व कागदपत्रांच्या आधारे तुमचा अर्ज तपासला जाईल आणि जर तुम्ही सर्व निकष पूर्ण करता, तर तुम्हाला या योजनेचा लाभ मिळेल.